पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्राथमिक क्रियाशील सभासद नोंदणी अभियानाला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत पिंपळी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच अश्विनी सुनील बनसोडे यांनी पिंपळी लिमटेक परिसरातील स्थानिक नागरिक तसेच बचत गटातील सुमारे ३०० महिला व युवतींची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिक क्रियाशील सभासद म्हणून नावनोंदणी करून उपक्रमात आघाडी घेतली आहे.
यावेळी बोलताना संभाजी होळकर व राजवर्धन शिंदे यांनी, “अश्विनी बनसोडे यांच्या कार्याचा आदर्श सर्व महिला पदाधिकारी यांनी घ्यावा. महिला क्रियाशील सभासद नोंदणी करून पक्ष संघटना अधिक बळकट करावी व जनतेची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत,” असे आवाहन केले.
©2026. All Rights Reserved.