विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती येथे एकदिवसीय शैक्षणिक अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge Systems – IKS) आणि सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एस.वाय.बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या शैक्षणिक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत शिंदे तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख व उपप्राचार्या प्रा. नीलिमा पेंढारकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षक म्हणून प्रा. नीलिमा देवी आणि प्रा. किरण गावडे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल बी. काळे, प्रा. डॉ. विशाल जाधव, प्रा. डॉ. सुषमा कुवारे आणि प्रा. डॉ. जया मस्के यांनी विद्यार्थ्यांना पंचकर्म तसेच आयुर्वेदातील ‘कृमी’ या संकल्पनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय प्रा. डॉ. सूरज भुंजे, प्रा. डॉ. मनीषा पाटील, प्रा. डॉ. युसूफ अन्सारी आणि प्रा. डॉ. सूर्यकांत रोकडे यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या विभागांची माहिती देत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक ज्ञानप्रणाली, आयुर्वेद आणि आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्र यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याची संधी मिळाली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत झाली.
भारतीय ज्ञानपरंपरेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी तसेच विविध वैद्यकीय शाखांमधील ज्ञानाची देवाणघेवाण समजून घेण्यासाठी ही भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.
©2026. All Rights Reserved.