ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

कृषी क्षेत्रातील केंद्र-राज्य समन्वय बळकट होणार ; पश्चिम क्षेत्रीय परिषदेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विश्वास

“पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील,” असे मत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते आज जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते.

देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात आज जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषीमंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकार व कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेले महाविस्तार ॲप, ॲग्रीस्टॅक व एआय धोरण यांचे या परिषदेत अनेकांनी कौतुक केले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्र-राज्य समन्वय बळकट करणे, विविध कृषी योजनांचा आढावा घेणे तसेच आगामी खरीप हंगाम २०२६ साठी धोरण निश्चित करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात‌ महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना ॲग्रीस्टॅक अंतर्गत १.३२ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि निर्यात क्षेत्रातील आघाडीचा उल्लेख केला. मात्र, २०२५-२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली. सुमारे १३६ लाख शेतकरी आणि १०५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने २० हजार १९६ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार त्यानी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसत २९ जिल्ह्यांतील २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडेही अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली आहे,असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

खरीप २०२६ साठी राज्याने १५८.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीबीएफ तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील.”

तसेच त्यांनी पुढे असेही नमूद केले, “अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.”

या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रसंगी माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रिय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी, राजस्थानचे कृषीमंत्री डॉ. किरोड़ी लाल मीना, गुजरातचे कृषीमंत्री जितुभाई सवजीभाई वाघानी, मध्यप्रदेशचे कृषीमंत्री ऐदल सिंह कंसाना, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष उत्तम पाल देसाई, कृषी विभागाचे केंद्रिय प्रधान सचिव अतिश चंद्रा यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.