ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी

मा. उपसरपंच अश्विनी बनसोडे यांचा पुढाकार ; ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिलेल्या मोठ्या योगदानाच्या स्मरणार्थ पिंपळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयास ‘लोकनेते अजितदादा पवार ग्रामसचिवालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी पिंपळी ग्रामपंचायतीच्या मा. उपसरपंच अश्विनी सुनील बनसोडे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कचेर शिंदे, पंचायत समिती सदस्या शुभांगी सुनिल आगवणे यांच्या हस्ते पिंपळी गावच्या सरपंच स्वाती ढवाण व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांच्याकडे देण्यात आले.

दिवंगत अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखानाच्या संचालक पदापासून सुरुवात करत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व चेअरमन, बारामतीचे खासदार-आमदार तसेच राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. जलसंपदा, वित्त, ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळत त्यांनी राज्याच्या तसेच शेतकरी वर्गाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.

बारामती तालुका विकासाच्या बाबतीत आदर्श ठरावा यासाठी त्यांनी हजारो कोटींची कामे केली. त्यामुळेच त्यांना ‘विकासपुरुष’ म्हणून ओळख मिळाली. ग्रामीण भागातील विकासकामांमध्येही त्यांनी विशेष लक्ष दिले. पिंपळी-लिमटेक गावासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा पाणी फिल्टर प्रकल्प, तसेच बारामतीच्या जिरायती भागातील तेरा गावांचा पाणीप्रश्न सोडवणारा जैनकवाडी बहुउद्देशीय पाणी साठवण तलाव उभारण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

याशिवाय पिंपळी गावात ग्रामपंचायतीची भव्य ग्रामसचिवालय इमारत, अंतर्गत रस्ते, बंदिस्त ड्रेनेज, शाळा, मंदिरे, समाजमंदिरे, वाचनालय, व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, आरोग्य व पशुवैद्यकीय दवाखाना अशा विविध विकासकामांसाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ ग्रामसचिवालयास त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी शिंदे, पंचायत समिती सदस्या शुभांगी आगवणे, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनील बनसोडे, मा. सरपंच मंगल केसकर, छत्रपती कारखान्याचे संचालक सतीश देवकाते, संतोष ढवाण, उपसरपंच अजित थोरात, मा. उपसरपंच आबासाहेब देवकाते, मा. उपसरपंच अश्विनी बनसोडे, मा. उपसरपंच राहुल बनकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव पवार, उमेश पिसाळ, सदस्या कोमल टेंबरे, मीनाक्षी देवकाते, निर्मला यादव, मा. सरपंच राजेंद्र केसकर, पिंपळी विकास सोसायटीचे मा. चेअरमन अशोक देवकाते, दादासो केसकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढवाण, नानासाहेब मदने, हरिभाऊ केसकर, बापूराव केसकर, दत्तात्रय तांबे, आकाश बनकर, जनार्धन बोराटे, रवींद्र धोत्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.