ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती

अवैध धंद्यांना आळा घालण्यासह गावागावात तंटामुक्ती, ग्राम सुरक्षा व महिला सुरक्षा समित्या होणार कार्यान्वित

बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालमत्तेविषयक गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

नियंत्रण कक्षातून नुकतीच बारामती तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी (दि.११) आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आगामी कामकाजाची दिशा स्पष्ट केली.

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तंटामुक्ती समिती

गावातील शेतीचे वाद, बांधावरील वाद, रस्त्यांवरील वाद तसेच किरकोळ कारणांवरून होणारे संघर्ष रोखण्यासाठी प्रत्येक गावात तंटामुक्ती समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून शरीराविरुद्धचे गुन्हे रोखण्यास मदत होणार असून गावातील वाद सामोपचाराने सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेतून गुन्हे व अवैध धंद्यांवर नजर

मालमत्तेविषयक गुन्हे तसेच अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी संदेश व सूचना पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिक व पोलिसांमध्ये तत्काळ समन्वय साधता येणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणार

गावातील महत्त्वाची ठिकाणे, चौक व संवेदनशील परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा तपास करण्यास मोठी मदत होणार आहे.

महिला सुरक्षा समित्यांद्वारे महिलांना संरक्षण

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांच्या समस्या जाणून घेऊन वेळीच उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शाळा व गावांमध्ये जनजागृती अभियान

पोलीस प्रशासनाकडून गावागावात तसेच शाळांमध्ये बैठका घेऊन नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. गावात कोणीही दारू, जुगार किंवा इतर अवैध धंदे करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला.



©2026. All Rights Reserved.