ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये विभागीय ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे दिमाखदार आयोजन ; ३८० हून अधिक प्रकल्पांचे सादरीकरण. || सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला अभ्यासभेट ; दुग्धप्रक्रिया उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान. || संशोधनाच्या प्रयोगशाळेतून शाश्वत शेतीचा धडा ; सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची NIASM ला अभ्यासभेट. || ५९ कालव्याला तातडीने एक आवर्तन द्या ! ; जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे आर्त मागणी. || आयुर्वेद आणि आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव !. || विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. ||

संशोधनाच्या प्रयोगशाळेतून शाश्वत शेतीचा धडा ; सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची NIASM ला अभ्यासभेट

पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष संशोधनाची जोड मिळाली, की शिक्षणाचा अनुभव अधिक समृद्ध होतो. याच उद्देशाने विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या तृतीय वर्ष विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (NIASM), बारामती येथे अभ्यासभेट दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत अनुभवाधारित शिक्षणाचा भाग म्हणून आयोजित या भेटीत विद्यार्थ्यांनी कृषी संशोधन, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, किण्वन तंत्रज्ञान आणि कृषी जैवतंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी यासाठी संस्थेतील शास्त्रज्ञांशी संवाद साधताना दुष्काळ, क्षारता व अतिउष्णता यांसारख्या अजैविक ताणांचा पिकांवर होणारा परिणाम आणि त्यावरील वैज्ञानिक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

या भेटी दरम्यान संशोधन प्रयोगशाळा, आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, निर्जंतुक तंत्रे, नमुना हाताळणी, प्रयोगशाळेतील सुरक्षितता तसेच संशोधन नोंदींचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. संशोधन प्रक्षेत्राच्या भेटीत पर्यावरणीय घटक, वनस्पतींची वाढ आणि पीक उत्पादकता यांतील परस्परसंबंधही उलगडले. वर्गातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांशी जोडणारा हा अनुभव विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाची प्रेरणा निर्माण करणारा ठरला आणि त्यामुळे अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रकल्प सादर करताना त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.

प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रदीप पाटील, विभाग प्रमुख आणि उपप्राचार्या प्रा. नीलिमा पवार पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली. अभ्यासभेट समन्वयक प्रा. नीलिमा देवी अडुसुमल्ली यांनी नियोजन केले. प्रा. योगिता चौधरी, प्रा. किरण गावडे तसेच NIASM चे संचालक व प्रशासकीय सोशल विंग यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विभागाने कृतज्ञता व्यक्त केली.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.