क्विक हिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने विद्या प्रतिष्ठान कॉलेजमध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृतीपर पथनाट्य आयोजन करण्यात आले. सायबर सुरक्षा, डिजिटल सुरक्षितता आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मास ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या. डिजिटल माध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार कसे करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर सायबर सुरक्षेबाबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीही मिळाली.
©2026. All Rights Reserved.