ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

शैक्षणिक साहित्याने तुला, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत जाहीर

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, सोनाई उद्योग समूहाचे संचालक तथा भाजपाचे युवा नेते प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविणभैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

वाढदिवसानिमित्त प्रवीण माने यांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांना पुष्पगुच्छ, हार-तुरे किंवा भेटवस्तू न आणण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, दप्तर व इतर शालेय साहित्य भेट म्हणून आणले. संकलित करण्यात आलेले हे साहित्य इंदापूर तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रवीण माने यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी प्रवीण माने यांनी विशेष पुढाकार घेत विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षण शुल्क तसेच शालांत परीक्षा शुल्कासाठी आर्थिक मदत जाहीर केली. यासंदर्भातील धनादेश त्यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक शिनगारे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी प्रवीण माने यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना, वैयक्तिक आनंदाचा दिवस समाजोपयोगी उपक्रमांसाठी समर्पित करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

हा उपक्रम प्रविणभैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विशाल रणवरे, रविराज चव्हाण, निलेश जाधव, साधु नरुटे, माधव फलफले आणि प्रविण निगडे यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.

यापुढेही प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षणाला बळ देणारा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा वाढदिवस इंदापूर तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.



©2026. All Rights Reserved.