ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात

विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील अन्नतंत्रज्ञान विभाग, सकाळ SIILC, करिअर कट्टा आणि इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ९ दिवसीय “अन्न प्रक्रिया उद्योजकता प्रशिक्षण (On Job Training)” कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उद्योगसिद्धतेकडे महत्त्वाचे पाऊल टाकले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, कोणार्क हिट सिस्टमचे संचालक बाळासाहेब धुलगुडे व आनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशिद, डॉ. संजय खिलारे, डॉ. सुनील ओगले तसेच विभागप्रमुख प्रा. सुजाता पाटील उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून कापिला फूडच्या सीईओ व उद्योगकता विकास उत्कृष्टता पुरस्कारप्राप्त गंधाली दिंडे यांनी विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, आव्हाने आणि यशस्वी व्यवसाय उभारणीचे बारकावे सविस्तर समजावून सांगितले. १०० हून अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन केलेल्या त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना थेट लाभ झाला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख दृष्टीकोन देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. अन्न उत्पादन प्रक्रिया, खर्च नियोजन, नफा–तोटा विश्लेषण, दर्जा नियंत्रण, स्टँडर्ड रेसिपी, पॅकेजिंग आणि विक्रीयोग्य उत्पादन विकास यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी चायनीज खाद्यपदार्थांमध्ये फ्राईड राईस, हक्का नूडल्स, ड्राय व ग्रेव्ही मंचुरियन; चाट–चौपाटी प्रकारात रगडा पॅटीस, पाणीपुरी, कोल्हापुरी भेळ, रगडा पुरी, बॉबी चाट; तसेच फास्ट फूड व स्नॅक्समध्ये उलटा वडा पाव, सोया ६५, नूडल्स पकोडा, बाकरवडी, गुलमोहर चिवडा, पालक भडंग, पुदिन्याची मठरी आदी पदार्थांची व्यावसायिक पद्धतीने निर्मिती शिकली. फरसाण निर्मितीत डायट चिवडा, पुदिना चिवडा, लसूण शेव, पापडी, गाठी शेव, कोल्हापुरी फरसाण आणि भेळ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रोफेशनल बेकरी सत्रात मिलेट व ट्रेडिंग कुकीज, ब्रेड, बिस्किटे, खारी, टोस्ट यांसारखी उत्पादने व्यावसायिक दर्जानुसार तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. समारोप सत्रात अक्षय घोरपडे यांनी स्टार्टअप व बिझनेस मॅनेजमेंट, क्लाउड किचन संकल्पना, हॉटेल व फूड बिझनेस मॉडेल, ब्रँडिंग आणि डिजिटल प्रमोशन (Canva) यांवर मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख प्रा. सुजाता पाटील, SIILC चे वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे तसेच अन्नतंत्रज्ञान विभागातील प्रा. दीपाली मोहिते, प्रा. अंजनी घाडगे, प्रा. प्रतीक्षा केंजळे आणि प्रा. प्रतीक्षा घाग यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वरोजगार व स्टार्टअप उभारणीचा आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात सक्षम अन्न उद्योजक घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांचा १०० टक्के प्रतिसाद लाभतो, हेच या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले.



©2026. All Rights Reserved.