ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील

उसाचे एकरी उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्याचं आवाहन ; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून देशातील वाढत्या ऊर्जेची गरज व मागणी लक्षात घेऊन 12 टी.पी.डी. क्षमतेच्या सी.बी.जी. (कॉम्प्रस्ड बायोगॅस) प्लांट उभारणीचे नियोजन सूरू आहे. कॉम्प्रस्ड बायोगॅस हे शाश्वत आणि पर्यावरणपूरक इंधन आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 14) दिली.

शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2025-26 ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सी.बी.जी. प्लांटसाठी लागणारे प्रेस मड, स्पेंट वॉश,  बहुवर्षीय नेपियर गवत (गिनी गवत), शेतीतील अवशेष (ॲग्रो वेस्ट) आदी आपल्या भागामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे हा प्रकल्प 12 ही महिने सुरू राहील. या उत्पादित कॉम्प्रेस्ड बायोगॅसला (C.B.G.) सर्वत्र मागणी आहे. तसेच या प्लांटसाठी सरकारचे अनुदान मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, नीरा भीमावरती स्थापनेपासून 28 वर्षे झाली शेतकऱ्यांचा अढळ विश्वास आहे. या विश्वासास पात्र राहून संस्थेचे कामकाज केले जात असल्याने, कारखान्याची प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांना सर्वोच्च ऊस दर देणेसाठी कारखान्याचा साखर उतारा वाढीकरिता, चांगल्या गुणवत्तेचा ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. आगामी काळात आपल्या कारखान्याचा समावेश राज्यातील प्रमुख कारखान्यांमध्ये असेल, यात शंका नाही.

देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला इथेनॉल शिवाय पर्याय नाही तसेच इथेनॉल ही काळाची गरज आहे. सध्या ई-20 इथेनॉल संदर्भात अपप्रचार सुरू आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे गतवर्षी एक कोटी 65 लाख एवढ्या कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी इथेनॉल आवश्यक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात सुमारे 25 ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात 5 गटांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भीमेवरील भाटनिमगाव, टणु, शेवरे असे 3 बंधारे असे 16 बंधारे अडविण्याची जबाबदारी निरा भीमा कारखाना घेणार आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून देशातील साखर उद्योगाचे प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावले जात असून, त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याचे  हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांना पुण्यतिथी दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.

यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भाग्यश्री पाटील म्हणाल्या, कारखान्याने अहवाल सालातील सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्ये 5,25,657 मे. टन ऊस गाळप करीत सरासरी साखर उतारा 10.76 टक्के मिळाला आहे. तसेच कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, बायोकंपोस्ट प्रकल्प आदी उपपदार्थ प्रकल्प उत्कृष्टपणे कार्यरत राहिले. सदरच्या हंगामात कारखान्याने स्थापनेपासून प्रथमच एका दिवसामध्ये उच्चांकी 6400  मे. टन उसाचे गाळप केले तसेच हंगामामध्ये प्रतिदिनी सरासरी 5815 मे.टन. गाळप क्षमतेचा उच्चांकही निर्माण  केला. या हंगामात गाळप झालेल्या सर्व ऊसाचे पेमेंट प्रति टन रू. 3101  प्रमाणे तसेच ऊस वाहतूक तोडणी बिले वेळेवरती अदा करण्यात आली आहेत.

कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली आगामी गळीत हंगामामध्ये उसाचे 7 लाख मे. टन गाळप पूर्ण करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. सहकार चळवळ चालवताना व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक असून, त्यामुळे आगामी काळात कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देईल, अशी ग्वाही भाग्यश्री पाटील यांनी दिली.

प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी केले. तर श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. यावेळी पंडितराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, कांतीलाल झगडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे,  रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, शिवाजी हांगे, अँड. अनिल पाटील, दत्तात्रय शिर्के, उपसभापती जयकुमार कारंडे, अमरदीप काळकुटे, महावीर गांधी, चंद्रकांत भोसले, मनोज पाटील, विकास पाटील, किरण पाटील, मोहन गुळवे, प्रसाद पाटील, तानाजी नाईक, दयाराम गायकवाड, रामचंद्र पाटील, सुरेश मेहेर, महादेव शेंडगे, नागेश नागेश नष्टे, भागवत गोरे आदीसह पदाधिकारी, सभासद, अधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.

◆ राजवर्धन पाटील यांना नीरा-भीमा ऊस भूषण पुरस्कार प्रदान

यावार्षिक सभेमध्ये सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्यास 1089 टन एवढा सर्वाधिक ऊस पुरवठा केलेबद्दल राजवर्धन पाटील यांचा माजी अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते नीरा-भीमा ऊस भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच यावेळी सुरू, आडसाली, पूर्व हंगामी व खोडवा या गटामध्ये एकरी सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या प्रत्येकी 3 शेतकऱ्यांचा तसेच  ऊस तोडणी वाहतुकीमध्ये सर्वोत्कृष्ट ऊस पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टर, बजाट, बैलगाडी या गटामध्ये प्रत्येकी 3 या प्रमाणे यावेळी एकूण 22 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारातून इतर शेतकऱ्यांनी, वाहतूकदारांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन भाषणात हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.

◆ ऊसाचे एकरी उत्पन्न वाढीसाठी गांभीर्याने लक्ष द्या : हर्षवर्धन पाटील

शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे एकरी उत्पन्न वाढवण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी उस पिकाचे जास्त उत्पन्न व साखर उतारा देणारे नवीन वाण व रोपे वापरावीत, ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करावा, उसाला उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून शेततळी गरजेनुसार करावीत. सध्या शेतकऱ्यांना ऊस पिकाचे एकरी उत्पन्न वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चापुढे ऊस शेती आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर होण्यास मदत होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.



©2026. All Rights Reserved.