विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयासह बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. सपकाळ यांनी “Design and Development of Framework for Analysis Using IoT for Farming in Pune Region” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि आयओटी (Internet of Things) च्या माध्यमातून शेती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या संशोधनासाठी त्यांना चिखली येथील डॉ. अविनाश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री व विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, तसेच डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, कर्नल श्रीष कंबोज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, विभागप्रमुख डॉ. गजानन जोशी, डॉ. जगदीश सांगवीकर, प्रा. किशोर ढाणे, डॉ. गौतम कुदळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांच्या या संशोधनामुळे संगणकशास्त्र आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासाला नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मित्रपरिवार, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांनीही त्यांच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
©2026. All Rights Reserved.