ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उर्वरित निवडणुकांची घोषणा

महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला असून राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आणि महानगरपालिकांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात न होता, सध्या केवळ १२ जिल्ह्यांपुरत्याच निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर आदेश आल्यानंतरच पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

● जिल्हाधिकारी प्रसिद्धी : १६ जानेवारी
● अर्ज स्वीकारणे : १६ ते २२ जानेवारी
● अर्ज छाननी : २२ जानेवारी
● उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)
● अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी (दुपारी ३:३० नंतर)
● मतदान : ५ फेब्रुवारी (सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०)
● मतमोजणी : ७ फेब्रुवारी (सकाळी १० वाजता)

तालुक्यांत इच्छुकांची गर्दी, राजकीय हालचालींना वेग

निवडणुकीची घोषणा होताच तालुका पातळीवर इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, संपर्क दौरे सुरू केले असून पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे. काही ठिकाणी माजी पदाधिकारी, आजी–माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमुळे आधीच तापलेले राजकीय वातावरण आता ग्रामीण भागात अधिकच चुरशीचे होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामीण सत्ताकेंद्रासाठी रंगणार लढत

जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचे निकाल आगामी काळातील राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.