ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील

दरवाढ व इथेनॉल भाव सुधारण्यासाठी सहकार मंत्री अमित शहांना शिष्टमंडळ भेटणार

देशात सुरू असलेल्या चालू ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३८५० रुपये होता, मात्र सध्या त्यामध्ये सुमारे ३०० रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ न झाल्याने साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

साखर व इथेनॉल हे कारखान्यांचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असून, या दोन्ही माध्यमांतून मिळणारे उत्पन्न अपुरे ठरत असल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांची ऊस बिले १४ दिवसांत अदा करताना अडचणी येत आहेत. परिणामी कारखान्यांना वाढीव कर्ज घेऊन व्याजाच्या ओझ्याखाली जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही परिस्थिती देशातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर (MSP) प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलच्या विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात लवकरच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.

केंद्र सरकारकडून भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील साखर कारखानदारी क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग असलेले शिष्टमंडळ वस्तुस्थितीनिष्ठ व अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारसमोर मांडून सविस्तर चर्चा करणार आहे.

साखर (नियंत्रण) आदेश २०२५ मधील कलम ९ नुसार साखरेच्या किमान आधारभूत किमतीत उसाची एफआरपी, रूपांतरण खर्च आणि उपउत्पादनांमधील महसूल विचारात घेणे आवश्यक आहे. सध्या उसाचा सरासरी उत्पादन खर्च (तोडणी व वाहतुकीसह) प्रतिटन ४ हजार रुपयांपेक्षा अधिक असून, साखरेची सरासरी विक्री किंमत मात्र प्रतिक्विंटल सुमारे ३६०० रुपये आहे. या तफावतीमुळे कारखान्यांवर आर्थिक ताण येत असून शेतकऱ्यांना ऊस देयके मिळण्यात विलंब होत आहे.

यापूर्वी साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ३१ रुपये असताना उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये होती. सध्या ती वाढून ३५५० रुपये झाली असून ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान एक्स-मिल साखरेचे दर प्रतिकिलो ३८ ते ४० रुपये, तर किरकोळ दर ४६ ते ४७ रुपये होते आणि ते ग्राहकांनी विनातक्रार स्वीकारले. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच, इथेनॉलच्या मागील दरवाढीनंतर उसाच्या एफआरपीमध्ये सुमारे १६ टक्के वाढ झाली असली तरी इथेनॉलच्या किमती मात्र स्थिर आहेत. त्यामुळे उसावर आधारित कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमती वाढवाव्यात आणि साखर व धान्यावर आधारित इथेनॉलसाठी न्याय्य दररचना ठेवावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४१० ते ४३० डॉलर प्रतिटन (एफओबी) असल्याने निर्यात फारशी परवडणारी नसली तरी जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या काळात ब्राझीलची साखर निर्यात मर्यादित असते. त्यामुळे देशातील अतिरिक्त साठा लक्षात घेता आणखी ५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी देऊन ती एनसीईएलमार्फत करावी, अशी मागणीही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.