जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत माळेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (८ मार्च) एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी पोलीस ठाण्याचा संपूर्ण कार्यभार महिला पोलिस अंमलदारांच्या हाती देण्यात आला. दिवसभर पोलीस ठाण्यातील विविध विभागांचे कामकाज महिला पोलिसांनी जबाबदारीने सांभाळले.
या उपक्रमात ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार शेख यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच CCTNS विभागात महिला अंमलदार गायकवाड व जाधव, वायरलेस विभागात महिला अंमलदार शिंदे, डायल ११२ सेवेसाठी महिला अंमलदार केंद्रे व सूळ, पासपोर्ट विभागात महिला अंमलदार बनसोडे, मदतनीस म्हणून महिला अंमलदार बनगर आणि वाहन चालक म्हणून महिला अंमलदार प्रेरणा सावंत यांनी कर्तव्य पार पाडले.
महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पोलीस दलातील महिलांची कार्यक्षमता व नेतृत्वक्षमता अधोरेखित झाली.
या कामकाजादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी सर्व महिला पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
©2026. All Rights Reserved.