शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयावर आधारित विशेष प्रश्नमंजुषा आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा अंतर्गत क्विक हिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने घेण्यात आला.
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, पासवर्ड सुरक्षा, सोशल मीडिया सुरक्षा आणि डिजिटल गोपनीयता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध सायबर सुरक्षा विषयांवरील प्रश्नमंजुषा सोडवली. प्रश्नमंजुषेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती मिळण्यासोबतच डिजिटल जगात अधिक जास्त जबाबदारीने व सुरक्षितपणे वावरण्याचे महत्त्व समजले.
“सायबर सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रश्नमंजुषीच्या माध्यमातून माहिती मिळाल्यामुळे हा उपक्रम अतिशय उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरला,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
©2026. All Rights Reserved.