ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत बारामती येथील एका शाळेत विशेष सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत पूर्वा चव्हाण आणि विनया लाखे या विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी सुरक्षित संकेतशब्दांचा वापर, अनोळखी लिंक वर क्लिक न करणे, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे, सोशल मीडियावरील गोपनीयतेचे संरक्षण तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर फसवणुकीचे विविध प्रकार उदाहरणांसह समजावून सांगत विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असून, योग्य माहिती आणि सतर्कता यांच्या माध्यमातून अनेक सायबर फसवणुका टाळता येऊ शकतात, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या जनजागृती कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेविषयी विविध प्रश्न विचारून उत्सुकता व्यक्त केली.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.



©2026. All Rights Reserved.