विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना अज्ञात कॉल, बनावट संकेतस्थळे, ऑनलाइन गेमिंगमधील फसवणूक, ओटीपी आणि आर्थिक फसवणुकीपासून बचाव, तसेच सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय डिजिटल साक्षरतेचे महत्त्व आणि शासकीय ऑनलाइन सेवांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
या जनजागृती उपक्रमात नेहा कुंभार व ऋतुजा माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. सुरक्षित डिजिटल व्यवहार, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरला.
©2026. All Rights Reserved.