ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये विभागीय ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे दिमाखदार आयोजन ; ३८० हून अधिक प्रकल्पांचे सादरीकरण. || सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला अभ्यासभेट ; दुग्धप्रक्रिया उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान. || संशोधनाच्या प्रयोगशाळेतून शाश्वत शेतीचा धडा ; सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांची NIASM ला अभ्यासभेट. || ५९ कालव्याला तातडीने एक आवर्तन द्या ! ; जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे आर्त मागणी. || आयुर्वेद आणि आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव !. || विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. ||

५९ कालव्याला तातडीने एक आवर्तन द्या ! ; जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे आर्त मागणी

प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

५९ कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर सध्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचा चारा पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोतही धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ५९ कालव्याला तातडीने एक आवर्तन देण्यात यावे, अशी आर्त मागणी कालव्यावर अवलंबून असलेल्या गरजू शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले.

५९ कालव्याला एकदा पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन महिने पुरेल एवढा जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही कार्यरत राहण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. वेळेत पाणी मिळाले नाही, तर येत्या महिन्याभरात जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाकडे मदतीची मागणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. त्यामुळे कालव्याला आवर्तन दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासोबतच शासनावरील संभाव्य आर्थिक भारही कमी होऊ शकतो, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली आहे.

“आम्ही आपणास मायबाप समजून पाण्याची मागणी करीत आहोत. ५९ कालव्याला पाणी मिळाल्यास आम्हाला आमची आणि आमच्या जनावरांची काळजी घेता येईल. त्यामुळे शेटफळ तलावातील पाण्याचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण करून ५९ कालव्याला तातडीने एक आवर्तन द्यावे,” अशी आर्त विनंती शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

● प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष ●

५९ कालव्यावरील शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेटफळ तलावातील पाण्याचा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ५९ कालव्याला आवर्तन मिळणार का आणि त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.