ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील

वीरपत्नींना जिजाऊ पुरस्कार, सैनिक कुटुंबीयांचा सन्मान

राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला तरी स्त्रीशक्ती किती शक्तिशाली, गतिमान आणि प्रभावशाली आहे याची प्रचिती येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

शिवभक्त परिवार इंदापूर व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक निश्चित होणार, या दृढ संकल्पनेने राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाचा वाटा उचलला. जिजाऊंच्या इतिहासातील संघर्षातून धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण निर्माण होतात. महिलांना व मुलींना आयुष्यात संघर्षाच्या प्रसंगी राजमाता जिजाऊंची आठवण ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव यांचे थेट १६ वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव तसेच इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट १३ वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी वीरपत्नी गौरी अशोक इंगवले यांना यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आजी-माजी सैनिक, एस.पी.आर.एफ. व सी.आर.पी.एफ. दलातील जवानांच्या माता व पत्नी यांचे शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या वतीने जिजाऊ पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांचाही सन्मान करण्यात आला.

श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव म्हणाले, “प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असे वाटते, मात्र त्याआधी प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ जन्माला यायला हव्यात.”

श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर म्हणाले, “महापुरुषांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात लोकशाही वातावरणात जगतो. राष्ट्र प्रथम या भावनेतून त्यांच्या विचारधारेचा अंगीकार करणे आवश्यक आहे.”

कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष व समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी राजमाता जिजाऊंच्या संघर्षाचे व स्वामी विवेकानंदांच्या युवकप्रेरक कार्याचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना इतिहासातील घटनांमधून प्रेरणा घेऊन आजच्या काळात सकारात्मक कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमास वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, वीरपत्नी हेमलता बाबुराव साबळे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, नगरसेवक अनिल पवार, माजी नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रेय अनपट यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन फलफले सर व नितीन भोसले यांनी केले, तर आभार बापू जामदार यांनी मानले.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.