ताज्या बातम्या
डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. ||

अजित पवारांनी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने लाडक्या बहिणींच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी बारामती मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी अजितदादा पवार यांना खा. सुनेत्रा पवार यांनी औक्षण करीत विजयीभव म्हणत विजयाचा कुंकूम तिलक लावला. यावेळी सहयोग सोसायटी समोर हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून भव्य मिरवणुकीने बारामती शहरातील प्रमुख मार्गावरून हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात अजित पवार यांनी प्रशासकीय भवन येथे जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राजकीय व सहकार क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशव जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व माजी नगरसेवक किरण गुजर यांचेसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच मोठ्या संख्येने महिला या मिरवणुकीत सामील झाल्या होत्या.

प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार

आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजितदादा यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील श्री मारुतीरायाच्या मुर्तीला नमस्कार व आरती करून जाहिर सभा घेतली. यावेळी जाहीर सभेला बारामती व पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नामवंत मंडळी आवर्जुन उपस्थित होती. मिरवणुकीत तसेच अर्ज दाखल करताना अजितदादांचे सुपूत्र पार्थ आणि जय हे दोघेही त्यांच्या सोबतच होते.

तात्यासाहेब पवारांची फॅमिली कष्टातून पुढे आली. वडीलांच्या माघारी आईने कष्ट करून कुटुंब उभे केले. ती कुटुंबाला सांगत होती की माझ्या दादाच्या विरोधात उभे राहू नका. तरीही उमेदवार दिला गेला, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले असे म्हणायचे का? या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला केला. कुटुंबातील या बाबी सांगताना ते काही क्षण भावनिक झाले. अजित पवार यांच्या प्रचाराची सुरुवात कन्हेरी येथील मारुती मंदिरातून झाली. यावेळी ते बोलत होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बारामती शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीला भरघोस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

अजित पवार म्हणाले, लोकसभेला सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही माझी चूक होती. मी मनाचा मोठेपणा दाखवत माझ्याकडून चूक झाल्याचे कबुल केले. मग आता चूक कोणी केली ? आई सांगतेय की माझ्या दादाविरोधात उमेदवार देवू नका. हे जे काही ज्या पद्धतीने चाललेय ते बरोबर नाही असे अजित पवार म्हणाले. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंनी तरी सांगायला पाहिजे होते. आता जे घडतेय त्यावरून साहेबांनी आमचे तात्यासाहेबांचे घर फोडले असे म्हणायचे का. मी जीवाला जीव देणारा माणूस आहे. पण या सगळ्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नका. एकोपा ठेवायला पिढ्यान पिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, घरातील भांडण चार भिंतीच्या आत ठेवायचे असते. त्यात एकदा दरी पडली की सांधायला दुसरे कोणी येत नाही. सगळ्यांनी एकोप्याने राहिले तर घर पुढे जाते. मी काम करणारा माणूस आहे. विरोधक म्हणतात की फक्त इमारती, रस्ते, शाळा कॉलेज बांधले की विकास झाला का. मग त्यांची विकासाची व्याख्या तरी काय आहे, असा सवाल पवार यांनी केला.

बारामतीकरांनी गत निवडणूकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी केले. त्यामुळे बारामतीत गेल्या पाच वर्षात ९ हजार कोटींचा निधी आणला. मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. आता विरोधक मलिदा गँग म्हणून हिणवतात. कसली मलिदा गँग. कामे आपल्याच भागातील ठेकेदारांना दिली ना. त्यातूनही त्यांच्याकडून काही चुकीचे घडले असेल तर मी कोणाला पाठीशी घालणार नाही. पण उगाच मलिदा मलिदा करून त्यांना नाऊमेद कणे योग्य नाही. कोणी चुकत असेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करू असे पवार म्हणाले.

बारामतीच्या जनतेने लोकसभेला ताई, विधानसभेला दादा असे ठरवले होते. अर्थात हा दादा म्हणजे मी आहे अशी कोटी करत अजित पवार म्हणाले, इथे बसलेल्या अनेकांनी सुप्रियाचे काम केले. मी ते मान्य केले. लोकसभेनंतर मी नाराज होतो. मला शिरुरकर तेथून उभे रहा म्हणत होते. परंतु बारामतीतील कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. मला राज्यभर फिरायचे आहे. त्यामुळे बारामतीची प्रचाराची धुरा तुम्ही हाती घ्या असे आवाहन कार्यकर्त्यांना करत ते म्हणाले, तुम्ही पहिले आपले घर व्यवस्थित आहे का ते बघा, आपल्या गावावर लक्ष केंद्रीत करा. उगाच शेजारच्या गावात जावू नका. माझेच घर व्यवस्थित नाही म्हणून मला तुम्हाला बोलतानाही फार विचारपूर्वक बोलावे लागत असल्याचा टोला पवार यांनी हाणला. मला रात्रीच्या बारा वाजता बोलवा, मी हजर असेन. पण मागच्या निवडणूकीसारखे भावनिक होवू नका. विरोधकांकडे आता एकही मुद्दा शिल्लक नाही. तुम्ही जेवढ्या मताधिक्याने विजयी कराल तेवढा अधिकचा निधी मी बारामतीला देईन, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.