ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

इंदापूर तालुक्याच्या सेवेसाठी आ. भरणेंना विधानसभेत पाठवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर तालुक्याला सहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी अवघ्या तीन वर्षांत दिला असून आणखी विकास करण्यासाठी खोट्या प्रचाराला बळी न पडता रात्री बाराला जरी माझी गरज लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे, हा शब्द देतो. २२ गावांचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे, कुठून पाणी आणायचं, कसं पाणी आणायचं याची जबाबदारी माझी आहे, मात्र आ. दत्तात्रय भरणे यांना आपली सेवा करण्यासाठी विधानसभेत माझ्याबरोबर पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आ. दत्तात्रय भरणेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शुक्रवारी (दि. २५) इंदापूर येथे आ. भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात आमदार भरणेंच्या नेतृत्त्वाखाली इंदापूरचा विकास आणि त्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पाहा, तुम्हाला फरक दिसेल. इंदापुरातील संस्था टिकल्या पाहिजेत, संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपाव्या लागतात, इंदापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भरणे यांची नेहमी धडपड असते. समोरची माणसे खोटारडी आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही आणली. ही योजना बंद झाली म्हणून थापा मारतात.

आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, दीपक काटे, बाळासाहेब सरवदे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटलांनी अनेक संस्था बंद पाडल्या

कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्यावर पाचशे कोटींचे कर्ज आहे. शंकरराव पाटील यांनी बिगर कर्ज कारखाना यांच्या ताब्यात दिला होता. यांनी तर लाखाचे १२ हजार केले, यांना निवडून देणार आहात का ? खरेदी-विक्री संघाची अवस्था, कळसचा वाईनरी प्रकल्प चालतोय का ? कर्मयोगी, निरा भीमा किती दर देतो ? माळेगाव, सोमेश्वर ३६३६ चा भाव देतात, अशी टीका पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. ते म्हणाले, पाटील यांनी कारखान्याला ३०० कोटी केंद्राकडून गोड बोलून आणले. सोयीचे आले की गेले सोडून. लोकसभेला अदृश्य प्रचार केला, यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. आम्हाला घरी जेवायला घातलं आणि विरोधकांचा अदृश्य प्रचार केला. इंदापूर अर्बन बँकेला दहा लाख रुपयांचा दंड झाला, काहीतरी चुकीचे केले म्हणून दंड झाला असेल. शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली आहे, असे करून राजकारण होत नाही. लोकांची कामे करावी लागतात. शिरसोडीचा पूल ३९५ कोटी रुपये देऊन मंजूर केला आणि हे म्हणतात, त्याची काही गरज नव्हती. इंदापूरची बाजारपेठ त्यामुळे तर वाढणार आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानसभेचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.



हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.