ताज्या बातम्या
विद्या प्रतिष्ठानमध्ये खगोलशास्त्र, अंतराळ निरीक्षण आणि अवकाश संशोधनाला मिळणार चालना. || मायक्रोबायोलॉजीच्या विश्वाला सीमा नाहीत; नोकरी शोधू नका, रोजगार निर्माण करा : डॉ. अरविंद देशमुख. || ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. || शिक्षक दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानमध्ये 'सायबर सुरक्षित' प्रश्नमंजुषा उत्साहात. || अवैध दारू वाहतूक करणारे दोघे ताब्यात ; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. || उर्दू माध्यमिक विद्यालयात ‘सायबर स्मार्ट’ होण्याचा धडा. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || निरा भिमा कारखान्याचे सी.बी.जी. प्लांट उभारणीचे नियोजन : हर्षवर्धन पाटील. || कर्जाचे धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिन्यांची साधी कैद. || पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला ७ वर्षे सश्रम कारावास. || डिजिटल युगात सुरक्षिततेचा मंत्र ; विद्या प्रतिष्ठानतर्फे सायबर जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शाळेत सायबर सुरक्षेचे धडे ; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती. || अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. ||

शरद पवारांच्या आशिर्वादाने इंदापुरात व राज्यात सत्ता बदल निश्चित : हर्षवर्धन पाटील

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.२५) केले.

नीरा नरसिंहपूर येथे प्राचीनकालीन श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या  निवडणुक प्रचाराचा शुभारंभ विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आला, सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर येथे कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.

ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सन १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून, श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची १० वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून, इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला १० वर्षे लागलेला ब्रेक हा आगामी ५ वर्षात भरून काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

● नीरा नरसिंहपूर येथून प्रचाराचा शुभारंभ ; हर्षवर्धन पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी.


सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेले समाजा-समाजामध्ये स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.


शरदचंद्र पवार हे वयाच्या ८४ व्या वर्षीही अपराजित योद्धा म्हणून लढत आहेत, या वयात त्यांचा काही स्वार्थ आहे का? तरीही ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, कारण त्यांना महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तुतारीला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.

प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोकराव घोगरे, शिवसेना (उबाठा)चे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष मोरे यांची भाषणे झाली.

यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अमोल भिसे, मयूरसिंह पाटील, गणेश इंगळे, पांडुरंग हेगडे, सिकंदर पैलवान, सुरेश जगदाळे, मनोज पाटील, किरण पाटील, रवींद्र जगदाळे, शेखर पाटील, रणजीत वाघमोडे, रोहित जगदाळे, सुरेश मेहेर, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, प्रकाशराव मोहिते, शरद जगदाळे पाटील, शिवाजी हांगे, तानाजीराव नाईक, उत्तमराव जाधव, विक्रम कोरटकर, प्रभाकर खाडे, रणजित गिरमे, हरिभाऊ बागल, प्रदीप बोडके, संजय शिंदे, नामदेव घोगरे, विठ्ठल घोगरे, नानासाहेब देवकर, कैलास हांगे, माणिकराव खाडे, राजाभाऊ मोहिते, बापू जगदाळे, दादा पाटील, हनुमंत काळे, पप्पू गोसावी, समीर पाटील, दत्तात्रय ताटे देशमुख, किशोर माहिते, मेघनाथ सरवदे, बळीराम गलांडे, अभिजीत पावसे,  शहाजी पावसे, महादेव भोसले, दीपक पावसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नाथाजी मोहिते यांनी मानले.

या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी व्याहळी येथे जाऊन भैरवनाथ मंदिरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडला.

खंडकरी शेतकऱ्यांना हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच जमिनी : ॲड. तेजसिंह पाटील

खंडकरी शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या हक्कासह मिळालेल्या जमिनी ह्या राज्य मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच मिळालेल्या आहेत, हे मी या मंदिरात श्रीलक्ष्मी-नृसिंहा समोर सांगत आहे. मी त्याकाळचा खंडकरी शेतकरी समितीचा सदस्य आहे, केवळ आणि केवळ हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच आपल्या तालुक्यातील सुमारे २ हजार २१५ एकर जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळू शकल्या, असे भाषणात अँड.तेजसिंह पाटील यांनी नमूद केले. राज्यातील कार्यक्षम व अभ्यासू नेतृत्व असलेले हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवा, असे आवाहनही अँड.तेजसिंह पाटील यांनी भाषणामध्ये केले.



©2026. All Rights Reserved.