ताज्या बातम्या
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता 'शाकाहारी पुलाव'. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' क्लबची स्थापना. || डिजिटल सुरक्षेची धुरा विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडे; ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लब ऑफिसर्सपदी चौघांची निवड. || वारकऱ्यांच्या वेशात विद्या प्रतिष्ठानची सातत्यपूर्व चौथी सायबर वारी उत्साहात. || युवा पत्रकार योगेश नालंदे यांना 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार' ; शेतीप्रसारातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल. || दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप; बारामती जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. || एकाच रात्रीतील ५ ठिकाणचे सशस्त्र दरोडे उघडकीस; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश. || प्रविण मानेंच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात. || दोन गावठी पिस्टल, रायफलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; सराईत गुन्हेगारास माळेगाव पोलिसांकडून अटक. || पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती’ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात. || हरवलेले १ लाख ५६ हजारांचे ७ मोबाईल मूळ मालकांना परत; माळेगाव पोलिसांची कामगिरी. || गुन्हे नियंत्रणासाठी 'पंचसूत्री' राबवणार ; नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती. || विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशन यांच्यात सायबर सुरक्षेसाठी सामंजस्य करार. || डॉ. क्रांती वाबळे सपकाळ यांना पीएच.डी. प्रदान; आयओटी आधारित कृषी संशोधनाला नवे परिमाण. || इथेनॉल, साखर दरवाढ व कर्ज पुनर्गठनाबाबत 10 दिवसांत निर्णय; अमित शहा यांची ग्वाही. || उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुषमा जाधव-गुळूमकर यांचा ‘महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न’ पुरस्काराने गौरव. || युवानेते युगेंद्र पवार यांच्याकडून पिंपळीच्या मारुती मंदिराला ५० हजारांचा ध्वनीक्षेपक संच भेट. || पिंपळी-लिमटेकमध्ये महिलांसाठी मोफत आरी वर्क प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शरयू फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. || १३२ कुटुंबांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न साकारणार ; अंकिता पाटील - ठाकरेंच्या पाठपुराव्याला मोठे यश. || पालखी महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा ; युवानेते प्रविण मानेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. || बारामती नगरपालिकेच्या नगरविकास विभागात ‘मीटर’शिवाय फाईल हालत नाही! ; नगरसेवक सुनील सस्ते यांच्याकडून नगरपालिका प्रशासनाला 'घरचा आहेर'. || मध्यस्थीमुळे वर्षभरात वाद मिटला; मुलीला साडेसतरा लाखांची पोटगी व पाच तोळे सोने. || जनता दरबाराच्या निमित्ताने अजित पवारांच्या पावलावर जय पवारांचे 'पाऊल'!. || 'शरद पार्क'च्या अध्यक्षपदी नितेश धुमाळ बिनविरोध. || बनावट पत्ते, बोगस भाडेकरारांचा असा हा खेळ ; आरटीई प्रवेशात घातला मोठा घोळ. || उजनीतून भीमा नदीत उद्यापासून पाणी सोडणार ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती. || आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरीप हंगाम २०२६ यशस्वी ठरणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. || थोपटेवाडीच्या पाणीप्रश्नावर सभापती किरण तावरेंची 'तत्परता'. || बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे. || जागतिक महिला दिनी माळेगाव पोलीस ठाण्यात 'महिलाराज'. || गावठी हातभट्टीवर छापा टाकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त. || हरवलेले १८ मोबाईल शोधून मालकांना परत ; माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. || ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान-कला-गणित प्रदर्शन ; विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष. || पिंपळी ग्रामसचिवालयाला ‘लोकनेते अजितदादा पवार’ नाव देण्याची मागणी. || अन्न प्रक्रिया प्रशिक्षणातून ८५ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाची दिशा ; विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ दिवसीय उपक्रम उत्साहात. || अजितदादांच्या अपघातामागे घात? ; मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले. || बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. ||

शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनखांच्या दालनाचे उद्घाटन उत्साहात

साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ३ महिने पाहता येणार ऐतिहासिक वाघनखे

● सातारा : प्रतिनिधी
शिवछत्रपतींच्या शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनखांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि.२०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात आली असून साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतर मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयातील इतिहास प्रेमींना ती पाहण्याची संधी मिळणार आहे. सातारा शहरासाठी आजचा क्षण अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींच्या राजधानीला यानिमित्ताने हा मान देण्यात आला.

यावेळी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशित केलेल्या 'शिवशौर्यगाथा' या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच भारतीय डाक विभागाच्या वतीने किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, शिवछत्रपतींची राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम अशी भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम असलेल्या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलतानामुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून त्यासाठी प्रत्येक योजना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी करत असल्याचे नमूद केले. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य असून त्यासाठी अनेक गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी निधी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरण स्थापन करून गडाचे जुने वैभव परत आणण्यासाठी १५० कोटींची तरतूद करत असल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच सातारा जिल्ह्यातील राणी ताराबाईंच्या समधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली.

यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, व्हिक्टोरिया आणि अलबर्ट म्युझियमचे प्रतिनिधी निकोलस मर्चंट, पोस्टमास्टर जनरल किशनकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.