● इंदापूर : प्रतिनिधी (१८ फेब्रुवारी २०२४)
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून दहावी-बारावी पास - नापास विद्यार्थी - विद्यार्थिनी व बेरोजगारांसाठी एसकेएफ व टाटा स्ट्राइव्ह कंपनींतर्गत ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात मोफत करियर व नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठानचे राहुल गुंडेकर यांनी दिलेली आहे.
सदर प्रशिक्षण हे पूर्णतः मोफत असून ते पुणे येथे होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीच्या जेवणासह राहण्याची सोयदेखील मोफत करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून यानंतर उमेदवार कंपनीमध्ये नोकरी किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकणार आहेत. तरी या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगारांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
©2026. All Rights Reserved.