ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

आशीर्वाद द्या 'सेवक' म्हणून काम करेल : प्रविण माने

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती व सोनाईचे संचालक प्रविण माने यांनी बुधवारी (दि.२३) शक्ति प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाराज झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापुरातील नेते प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचं निशाण फडकावलं, यातील प्रवीण माने यांनी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.


अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रवीण माने यांना समोरची गर्दी आणि गर्दीचं प्रेम पाहून हुंदका दाटून आला. आणि डोळ्यातून पाणी आले. समर्थकांच्या प्रेमापोटी माने भावनिक झाले. यावेळी व्यासपीठावरील त्यांचे वडील आणि सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने आणि त्यांच्या मातोश्री यांनाही यावेळी रडू कोसळलं.


यावेळी प्रवीण माने म्हणाले की, "११ तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकमताने सांगितलं की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. आपल्या समोर शरद पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचाही पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठमोठे नेते आहेत, संघटना आहे, गावोगावी पुढारी आहेत. आपल्याकडे फक्त तुमच्यासारखी सामान्य जनता आहे. टीका करून १० मतं मिळवण्यापेक्षा पाया पडून २० मतं मिळवू. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेत जाऊन मते मागू. याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण निवडून येणार आहोत" असे प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.


"लोकांनी सांगितलं आहे, आता जर माघार घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू. आपल्या सर्वांच्या साक्षीने, आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. लक्षात ठेवा मी एकटा आमदार होणार नाही, परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे" असे प्रविण माने म्हणाले. या वेळी ॲड. बापुसाहेब साबळे, आझाद मुलाणी, रामदास बनसुडे, पुंडलिक धुमाळ, विलास घोळवे, रविराज भाळे, विजया कोकाटे, नवनाथ माने, पप्पु फडतरे, शरद चितारे, राजेंद्र भोळे, तानाजी धोत्रे, बाबासो चवरे आदींनी मनोगते व्यक्त केली.

....अन टचकन डोळ्यात पाणी आलं.

सकाळी कुलदैवतासह विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी माने लवकर बाहेर पडले होते. घरातून बाहेर जाताना घरी कोणीही नव्हतं, पण जेव्हा दर्शन घेऊन आले तेव्हा त्यांची गाडीही गेटमधून आत जात नव्हती इतकी गर्दी जमली होती. लोकांचं हे प्रेम बघून डोळ्यांत टचकन पाणी आल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी प्रविण माने काहीसे भावनिक झाले. त्यांनी हुंदका दाबला मात्र डोळ्यात पाणी आले होते.


इंदापुरात १९९५ ची पुनरावृत्ती होणार !

इंदापुर तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा जेव्हा तिरंगी लढत होते, तेव्हा तेव्हा अपक्ष उमेदवार निवडून येतो असा इतिहास आहे. २०२४ ला ही इंदापुरात तिरंगी होतेय आणि यंदाही १९९५ ची पुनरावृत्ती होणार असल्याचे मत प्रविण माने यांनी व्यक्त केले.


अफवांचा पाऊस, बाबीर बुवांचा गुलाल अन मानेंची शपथ

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनेकांना विचारणा केली, सर्वांनी सांगितलं फॉर्म भरा पण माघारी घेऊ नका. त्याचवेळी फॉर्म भरून परत माघारी घेणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रविण माने यांनी खिशातून बाबीर बुवांच्या गुलालाची पुडी काढून त्यातील गुलालाची शपथ घेतली. "बाबीर बुवांच्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो, आज भरलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही" अशी शपथ घेत प्रविण माने यांनी सगळ्या अफवांना मुठमाती दिली.


१९९५ ला हर्षवर्धन पाटलांना हाताला धरून सरकार बनवायला लावलं होतं : दशरथ माने 

 १९९५ ला काँग्रेसने महाराष्ट्रात चुकीची तिकिटं वाटप केली होती. तेव्हा इंदापुरातुन बंडखोरी करायला लावली होती. तेव्हा मी वेगवेगळ्या चिन्हांवर राज्यात ४४ अपक्ष आमदार निवडून आले होते. तेव्हा हर्षवर्धन पाटलांना हाताला धरून सरकार बनवायला लावलं होतं, असा गौप्यस्फोट दशरथ माने यांनी केला.


प्रविण भैय्या शिवाय सरकारच बनवता येणार नाही 

 प्रविण माने अपक्ष निवडून येणार आहेत, त्यांच्याशिवाय राज्यात सरकारच बनवता येणार नसल्याचे मत दशरथ माने यांनी व्यक्त केले.


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.