ताज्या बातम्या
बारामतीत शेतकरी, महिला बचत गट, युवक व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अभियान. || घरपट्टी - पाणीपट्टी करवसुलीसाठी अश्विनी बनसोडे यांचा आदर्शवत पुढाकार. || राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रियाशील सभासद नोंदणी उपक्रमात अश्विनी बनसोडेंची आघाडी. || “राणाजी, यकीन... धोखा... मौका” प्रविण मानेंचे 'हे' व्हाट्सअप स्टेटस कुणासाठी?. || वृंदावन हॉटेलसमोरील पार्किंग वादातून जीवघेणा हल्ला ; मुख्य सूत्रधार तन्मेष साळुंखे अटकेत. || चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिने साध्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह दुप्पट रकमेची नुकसानभरपाई देण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल. || १५ दिवसांत घरकुलाचे काम सुरू करा, अन्यथा मंजुरी रद्द! ; गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा कडक इशारा . || राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. || राजमाता जिजाऊंच्या कार्यातून स्त्रीशक्तीची अपार ताकद दिसते : हर्षवर्धन पाटील. || साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग संकटात : हर्षवर्धन पाटील. || इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे कार्य राज्यात कौतुकास्पद : माजी आमदार दत्तात्रय सावंत. || शेळी - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; १२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त. || दत्त देवस्थान हेच समाजसंस्कारांचे प्रेरणास्थान : सारिकाताई भरणे. || पालखी महामार्गाच्या निकृष्ट कामांच्या चौकशीसह टोल वसुलीला स्थगिती द्या ; हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. || 'निरा - भिमा' कडून दुसऱ्या पंधरवड्याचेही ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. || नगराध्यक्षपदाचे उमेदवार पठाण मोहसिन अकबर यांचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध ; हटके वचननाम्याने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण !. || पैसा आणि लोकप्रियतेपेक्षा जीवनातील ध्येय व प्रेरणा महत्वाची : गौरी थोरात. || निरा - भिमाची वचनपूर्तीकडे वाटचाल ; १ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण. || अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव नगराध्यक्षपदाचे उमेदवार ; उमेदवारीत जुने - नवे समतोल साधण्याचा प्रयत्न. || प्रभाग क्र. १९ मध्ये इच्छुकांची गर्दी तरीही लोकांची नितेश धुमाळ यांनाच पसंती. || इंदापूर तालुक्यात मुरब्बी, मातब्बरांची चाचपणी सुरू ; नवख्या उमेदवारांचा उत्साह वाढला. || 'लोन क्लोज करतो' म्हणत फसवणूक करणारा गजाआड ; बारामती शहर पोलिसांची कारवाई. || आंतरराज्य गांजा रॅकेट उघडकीस ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त. || 'बिडा'च्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करणार : चंद्रशेखर यादव. || "तू खूप मोठी चूक केलीस!" जीवे मारण्याच्या कट रचणाऱ्यांविषयी मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट. || मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ कारवाई ; पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू. || तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले 'कमळ' ; सरपंचपदी प्राजक्ता वाघ यांची निवड. || २o२५ च्या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने ज्योती अमोल तुपे सन्मानित. || विद्या प्रतिष्ठानमध्ये 'नशामुक्त भारत' अभियान उत्साहात. || इंदापूर पंचायत समिती आरक्षण जाहीर ; कोणता गण कोणासाठी राखीव?. || इंदापूर वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार. || खरी पत्रकारिता लोकशाही बळकट करते : अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार. || पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : प्रविण माने. || निरा-भिमा कारखाना प्रतिटन १०० रुपये देणार ; शेतकऱ्यांची दिवाळी 'गोड' होणार. || करदात्यांना दिलासा ; Tax Audit Report सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. || भगरीच्या पिठामुळे आठ जणांना विषबाधा ; बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील घटना. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची नंदन डेअरीला उद्योगभेट ; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम. || बारामतीत चारचाकीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास. || चेक बाऊन्सप्रकरणी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल. || नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी. || विद्या प्रतिष्ठानच्या ‘पाटी’ला क्वालालंपूरमध्ये सुवर्णपदक. || सायबर सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी सरसावले. || 'जल्लोष २०२५' युवक महोत्सवात विद्या प्रतिष्ठान ठरले सर्वोत्कृष्ट. || ४ ऑक्टोबरपासून ‘सेम डे चेक क्लिअरिंग’ सेवा सुरू ; ग्राहकांना वेगवान व्यवहाराची हमी. || विद्यार्थ्यांच्या कल्पक संशोधनाला वाव ; ‘आविष्कार’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद. || विद्या प्रतिष्ठानच्या मुलींची कबड्डीत विजयी खेळी. || इंदापूर तालुक्यातील गावागावांत 'मोदी विकास मॅरेथॉन' राबवणार : प्रविण माने. || टेक्सटाईल पार्कमधील महिला कामगारांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती. || विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवर जनजागृती. || महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ ठरले सर्वोत्कृष्ट. ||

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातलं अन शेतातलं सगळं काही हरवून बसलेल्या बळीराजाला आपल्या लेखातून 'तुला जगलंच पाहिजे' म्हणत धीर देताहेत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी

तुला जगलेच पाहिजे माझ्या भावा

तुझ्या लेकरासाठी

तुझ्या म्हाताऱ्या आईबापासाठी

आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या कारभारणीसाठी...


हे अगदीच मान्य आहे की

असे सल्ले देणे नक्कीच सोपे असते.... 

पर:दुख शीतल असते...

तरीही सांगावेसे वाटतात चार शब्द...


पिकाचा चिखल बघताना, नांगरणीच्या दिवसापासून सगळे घामेजलेले दिवस तुला आठवत असतील...

उधारीवर घेतलेले बियाणे खते आणि औषधे... देणेकऱ्यांना दिलेले शब्द..

प्रकाशाकडे झेपावणारे बियाणाला फुटलेले अंकुर...

अंधार करील दूर अशी आशा...

अंकुर जागवता जागवता,

बघता बघता सारे संपले...


माती सुद्धा जिथं वाहून गेली,

तिथं आता कुठून सुरुवात करायची?

या तुझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही...


ज्या मातीत जन्म झाला,

ज्या मातीवर मोठा झाला ती मातीच शेतातून साथ सोडून गेल्यावर त्या उरलेल्या खडकावर डोके आपटायचं का? हे सारं सारं मनात येईल...


पण तरीही तुला जगावं लागेल...

मातीमोल झालेलं पीक,

शेतातली गेलेली माती आणि जगण्याचा आलेला चिखल

यातून उभे राहावे लागेल माझ्या भावा...

तू जर हताश होऊन निघून गेला तर त्या मागच्या माणसांनी कुणाकडे बघायचं मला सांग?


मान्य आहे,   

व्यवस्थेच्या या गर्दीतही तू एकटा आहेस...

तुझ्या शेतावर फिरणारे चॅनेलचे कॅमेरे लगेच पुन्हा नेत्यांची एकमेकातील भांडणे दाखवायला पुन्हा मुंबईत सरकलीत...

तुझ्या दुःखाला टीआरपी नाही मित्रा...

टीआरपीसाठी एक पडळकर तुझ्या दुःखाला भारी आहे...

तू बांधावर रडत बसताना, चिखलात लोळताना मुंबईत आय फोन खरेदीसाठी चेंगराचेंगरी होते आहे...

ही विसंगती हाच व्यवस्थेचा खरा चेहरा आहे.


तुला नुकसान भरपाई का मिळत नाही हे विचारण्यापेक्षा मध्यप्रदेशात एका बाईला दोन पाणीपुरी कमी मिळाल्या हे रिल शेअर करण्यात आम्हाला गंमत वाटतेय...


या मानसिकतेतील अंतराला शरद जोशी भारत-इंडिया म्हणत होते...

विचार करण्याचे इंद्रिय मेंदू नसून खिसा आहे असे त्यामुळेच ते बोलत होते...

शेतकऱ्यावर काहीच आमचे अवलंबून नाही...


त्याच्या आनंदावर आमचे सुख अवलंबून नाही आणि त्याच्या रडण्याने आमचे काहीही बिघडत नाही...

अशी मानसिकता तयार झालेला बांडगुळी वर्ग हीच आजची समस्या आहे...

त्याच्या डिजे वर नाचण्याचा आवाजात तुमच्या किंकाळ्या व्यवस्थे पर्यंत जाणारच नाहीत...

मिरवणुकीत लावलेल्या लाईटच्या प्रकाशझोतात तुझ्या आयुष्यातला अंधार पोहोचणार नाही मित्रा...


ट्रम्प त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो पण तुझ्या दुःखाने त्यांच्या आयुष्यावर ओरखडाही उमटणार नाही हा त्यांचा आत्मविश्वास तुझ्या दुःखाला अधिकच गहिरे करणारा आहे...

तुला कर्जमाफी दिल्यावर आमच्या टॅक्स मधून का देता हा प्रश्न विचारणारा आणि कर्ज बुडवून पळालेल्या वेळी गप्प राहणारा हाच वर्ग आहे...

या बोलक्या वर्गाचे मौन तुझ्या दुःखाचा सन्नाटा अधिकच गहिरा करत आहे भावा...


पण जेव्हा सावरशील तेव्हा बांधावर उभा राहून व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील...

आज सारे एकटे पडलेत त्यामुळे प्रत्येक संकट हवालदिल करून टाकते...

एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या संघटना होत्या...

तेव्हा कितीही संकट आली तरी आपण एकटे नाही ही भावना सुद्धा त्या संकटातून तरुन नेत

होती...

शेतकऱ्यांना चक्काजाम केला की सरकारे जाम होत होती आज आपण संघटित नाही, विखुरलेले आहोत...

त्यातून एकटेपण अधिक गहिरं होत आहे...


निसर्गाशी लढणं कठीण आहे पण सरकार आणि या लुटीच्या व्यवस्थेशी नक्कीच लढता येईल... आपल्या हक्काचा वाटा सरकारकडे मागता येईल...

ट्रिलियन डॉलर मध्ये वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह जर मेट्रो आणि महामार्ग बांधायला आणि शेअर मार्केट फुलण्याकडे जाणार असेल...

शरद जोशींच्या शब्दात भारताचे रक्त शोषून इंडिया कडेच जाणार असेल तर तो प्रवाह त्या प्रवाहात उतरून तो प्रवाह  उलटा फिरवावा लागेल...


आपल्याच पोटची पोर गोडी गुलाबी करून व्यवस्थेचे दलाल होऊन आपल्याला व्यवस्थेच्या दावणीला बांधत असते तर तो कावा ओळखून त्यांनाही झटकावे लागेल आणि त्या व्यवस्थेचा हिशोब बांधून मांडावा लागेल मित्रा...

त्यासाठी भांडावा लागेल मित्रा...


तेव्हा पंचनामे करा आणि हेक्टरी मदत करा , इथेच न थांबता माझ्या शेतातून या व्यवस्थेने नेलेल्या रुपया रुपयाच्या  हिशोब या व्यवस्थेला मागाव लागेल मित्रा...


एक पाऊस जर संपूर्ण संसाराची धूळधाण उडवत असेल तर या व्यवस्थेत एका दाण्याचे शंभर दाणे करून सुद्धा आपल्या पदरात काय पडलं याचा सुद्धा हिशोब मांडायची हीच वेळ आहे...


इतकी केविलवाणी अवस्था का झाली आमची?


पाऊस वर्षभर सारखा पडत राहणार,

पावसाने साथ दिली तर बाजार भाव पाडत राहणार...

कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ... पडणारा पाऊस आणि पडणारे भाव यातून सुटका होणार की नाही?

 

तेव्हा उठ आता, डोळे पूस 

भांबावलेल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवून शेतात चल... आणि जेव्हा सावरशील, तेव्हा आता संघटित व्हायचा निर्धार कर.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज बुलंद केला तर अर्थव्यवस्थेचा इंडियाकडे गेलेला प्रवाह पुन्हा खेड्याकडे वाहू लागेल...

तुझ्या संघटित शक्तीला टीआरपी असेल,

माध्यम सुद्धा पुन्हा बांधा बांधावर फिरू लागतील...

शेतकऱ्याच्या संघटित शक्तीला ओलांडून  कोणालाच जाता येणार नाही...

शेताचे पंचनामे जरूर झाले पाहिजेत...

पण व्यवस्थेचा पंचनामा करून पुन्हा एकदा राजकारणाच्या चिखलात संघटनाची पेरणी करावी लागेल...

आंदोलनांचे खत टाकावे लागेल त्यातून फुलून येणारे पीक हेच अंतिम उत्तर असेल, व्यवस्थेला झुकवणारे...


● लेखक : हेरंब कुलकर्णी

● मो. 8208589195

(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत)


हे ही वाचा


©2026. All Rights Reserved.