इंदापूर तालुका वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रवीण माने यांच्या वतीने रविवारी (दि.१२) सोनाई पॅलेस येथे सत्कार करण्यात आला.
कोणत्याही सामाजिक संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडणे हे समन्वय, एकता आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे. वकील संघटनेची नवी कार्यकारिणी समाजातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर राहील, अशी अपेक्षा असल्याचे मत माने यांनी यावेळी व्यक्त केले.
सत्कार सोहळ्यावेळी अध्यक्ष ॲड. साहिल खान, अध्यक्ष ॲड. माधव शितोळे, उपाध्यक्ष ॲड. संदीप शेंडे, उपाध्यक्ष ॲड. राम इजगुडे, सचिव ॲड. सुजित गायकवाड, ग्रंथपाल ॲड. शंतनू सवाणे, खजिनदार ॲड. सुमित वाघमारे, सदस्य ॲड. नवनाथ सोनटक्के व महिला प्रतिनिधी ॲड. ज्योती जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. साहिल खान यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला इंदापूर शहर भाजप मंडल अध्यक्ष किरण गाणबोटे, माजी अध्यक्ष राम आसबे, ॲड. आशितोष भोसले, ॲड. अवधूत डोंगरे, ॲड. जिमी मुलाणी, ॲड. सचिन राऊत, ॲड. मयूर शिंदे, नितीन आरडे, शिवाजी देवकर, सत्यजित रणवरे, सुयोग सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.