देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने इंदापूर तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) निमगांव केतकी (ता. इंदापूर) येथील संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे पार पडली.
इंदापूर विधानसभा भाजपाचे युवा नेते प्रविण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बोलताना माने म्हणाले की, “विकासपुरुष मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, मोदीजींच्या कार्यावरील प्रदर्शनी, विचारवंत संवाद परिषद, पुस्तक वितरण, विशेष व्यक्तींचा सन्मान तसेच ‘मोदी विकास मॅरेथॉन’ असे असंख्य उपक्रम तालुक्यातील प्रत्येक गावात राबवले जाणार आहेत.”
बैठकीला माजी सभापती मयुरसिंह पाटील, आकाश कांबळे, गोविंद देवकाते, धनंजय कामठे, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रविणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे, राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाताताई कुलकर्णी, प्रमिला राखुंडे, माधुरी भराटे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
©2026. All Rights Reserved.