बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत बीबीए (सीए) विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा' या जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलवर येणारे अज्ञात कॉल्स, बनावट लिंक्स, लॉटरी स्कॅम, ऑनलाइन गेमिंग फ्रॉड याविषयी माहिती दिली.
सायबर सुरक्षा ही आजच्या डिजिटल युगातील महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांनी विविध उदाहरणांद्वारे सायबर फसवणुकीपासून कसे वाचता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थितांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आणि सायबर जनजागृतीविषयी उत्सुकता व्यक्त केली. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचा बारामती येथे झालेला हा टप्पा यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांनी घेतलेली ही पुढाकार समाजात डिजिटल सुरक्षिततेबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
©2026. All Rights Reserved.