विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नंदन डेअरी, माळेगाव येथे उद्योगभेट आयोजित केली. अविष्कार संशोधन स्पर्धेत यशस्वी सहभागानंतर घेण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमात एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले.
या उद्योगभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दुध प्रक्रिया, पाश्चरायझेशन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती तसेच गुणवत्ता नियंत्रण याविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या कौशल्यांचा पाया रचला गेला.
या यशस्वी आयोजनासाठी प्रा. निलीमा देवी, योगिता चौधरी, गीतांजली पवार व प्रज्ञा सरोदे यांनी परिश्रम घेतले. विभागप्रमुख प्रा. नीलिमा पेंढारकर व डॉ. संजय सूर्यवंशी यांनी उद्योगक्षेत्राशी विद्यार्थ्यांचे नाते दृढ झाल्याचे सांगितले, तर उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद यांनी नंदन डेअरी प्रशासनाच्या सहकार्याचे कौतुक केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी अशा उपक्रमांची गरज असून शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता उद्योगाशी जोडल्याने ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराभिमुखतेस चालना मिळते, असे मत प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी व्यक्त केले.
©2026. All Rights Reserved.