Skin Asthetic & Cosmetology या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत केपीएम मीडिया अँड टेक एलएलपिच्या वतीने देण्यात येणारा २०२५ सालचा महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार ज्योती अमोल तुपे यांना प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते बुधवारी (दि.१५) सातारा येथे करण्यात आले. केपीएम मीडिया तर्फे समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने दरवर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.
ज्योती तुपे यांचे बारामती येथे लेडी केअर स्किन अस्थेटिक अँड लेझर या नावाने स्किन केअर सेंटर असून अत्यंत माफक दरात उत्कृष्ट प्रशिक्षण देण्याचे काम त्या २o१७ पासून करत आहेत.
व्यवसाय आणि प्रशिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये ज्योती तुपे यांनी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय असून त्यांनी अनेक गृहिणी व्यवसायिक तसेच नोकरदार वर्ग आणि समाजातील अनेकांना स्वावलंबी करण्यात ज्योती तुपे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल ज्योती तुपे यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे
आजपर्यंत केलेल्या कामाची दखल नामांकित संस्थेन घेतल्याचा आनंद आहे. यापुढेही त्याच जोशात काम करण्याचे बळ या पुरस्काराने मिळालेले असून यापुढेही एकनिष्ठतेने काम करत राहणार असल्याचे मत पुरस्कार विजेत्या ज्योती तुपे यांनी यावेळी व्यक्त केले.
©2026. All Rights Reserved.