● इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर विधानसभेच्या रिंगणात तिसरी आघाडी उतरणार असून अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे बुधवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बुधवरी सकाळी ९ वाजता शहरातील श्रीराम चौकातून ही रॅली सुरू होणार आहे. पोलीस स्टेशनसमोरील मार्केट कमिटीच्या मैदानावर सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती प्रविण माने यांनी यावेळी दिली.
तिसऱ्या आघाडीतील नेते, प्रविण माने व माने कुटुंबियांना तालुकादौऱ्यात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर त्यांनी इंदापूर मधून अपक्ष म्हणून उतरण्याचे ठरवले आहे.
प्रवीण माने यांनी 2019 साली पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती मात्र पक्षाने तूर्तास थांबण्याचा सल्ला दिला होता. 2024 ला प्रवीण माने यांना तुतारीतून तिकीट मिळण्याची शक्यता असतानाच ऐनवेळीच्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाने ती शक्यता दुरावली आणि यामुळेच प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे.
©2026. All Rights Reserved.